
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटकाच्या निवडणुकी दरम्यान बंगळुरुमध्ये रोड शो, कार्यकर्त्यांकडून ‘मोदी.. मोदी..’च्या घोषणा…
बेंगलोर प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, 7 मे) रोजी बंगळुरूमध्ये भव्य रोड शो मध्ये सहभाग नोंदवला. आज NEET प्रवेश परीक्षेमुळे रोड शो लहान मार्गावर होता. या रोड शोला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, 7 मे) रोजी बंगळुरूमध्ये भव्य रोड शो मध्ये सहभाग नोंदवला. आज NEET प्रवेश परीक्षेमुळे रोड शो लहान मार्गावर होता. या रोड शोला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. लोकांनी मोदी.. मोदी.. मोदी.. असे म्हणत त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी थिप्पासंद्रा येथील केम्पेगौडा पुतळा ते बेंगळुरूमधील ट्रिनिटी सर्कल दरम्यानच्या 10 किमीच्या अंतरावर कर्नाटकमध्ये रोड शो करत आहेत



