
यूपीएससी परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कौतुक…
ठाणे प्रतिनिधी
ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक 25 आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला., याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मुलीची भेट घेऊन तिचे कौतुक केले,
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (UPSC Result) लागला. यात ठाण्याची कश्मिरा संखे (Kashmira Sankhe) ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक 25 आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कश्मिराचे कौतुक करुन तिचा गौरव केला.



