vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई नाशिक रस्त्यावर ठाणे येथे, पूर्व द्रुतगती महामार्ग, भर पावसात प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेला ट्रक   धडकला…

मुंबई नाशिक रस्त्यावर ठाणे येथे, पूर्व द्रुतगती महामार्ग, भर पावसात प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेला ट्रक   धडकला…

ठाणे प्रतिनिधी

ट्रक चालक किरकोळ जखमी चालकाच्या पायाला मोठी दुखापतमुंबई नाशिक रस्त्यावर ठाणे येथे, पूर्व द्रुतगती महामार्ग, भर पावसात प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेला ट्रक   धडकला… *(अपघात होणे, वाहनचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दिनांक १४/०७/२०२३ रोजी ०२:२५ वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- शहर वाहतूक नियंत्रण कक्ष)* लेरिडा हॉटेल समोर, विवियाना मॉल जवळ, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे (प.) या ठिकाणी मुंबई नाशिक वाहिनीवर टाटा हेवी ट्रक RJ १४ GQ ०९०६ *(मालक:- श्री. महम्मद आबिद, चालक:- सतधाम खान, मार्ग:- मुंबई ते दिल्ली / माल – प्लास्टिक दाणे, वजन – ३० टन)* या ट्रकवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रोड डिवायडरला धडकून अपघात झाला होता. *सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी ०२- क्रेनसह, राबोडी पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, ठा.म.पा. विद्युत विभागाचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह व ०१- जेसीबी वाहनासह उपस्थित होते.*

 

*सदर घटनास्थळी वाहनचालक श्री. सतधाम खान (पु / वय ३२ वर्षे) यांच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.*

 

*घटनास्थळी रस्त्यावर पडलेले डिवायडरच्या काँक्रिटचे तुकडे व डेब्रिज आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून जेसीबी मार्फत रस्त्यावरून हटवण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी बांधण्यात आली आहे.*

 

*सदर ठिकाणी अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला असून मुंबई नाशिक रस्ता ०४:२० वाजताच्या सुमारास वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.*

संबंधित पोस्ट

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

इतर मागासवर्गीय महामंडळाकडून 50 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखांचे बिनव्याजी कर्ज वाटपाच्या प्रस्तावास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी- मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

अन्यथा संभाजीनगरमध्ये जात पडताळणीसाठी धरणे आंदोलन करणार.

सार्वजनिक बांधकाम विभाग-पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता..