vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उघड्या फ्यूज पेट्या व दरवाजे याची ,व्हाट्सएपवर माहिती कळविण्याचे महावितरणच आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे

*उघड्या फ्यूज पेट्या व दरवाजे याची ,व्हाट्सएपवर माहिती कळविण्याचे महावितरणचे आवाहन*आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

 

पुणे : प्रतिनिधी उघड्या फ्यूज पेट्या, दरवाजे, तुटलेल्या तारा इत्यादींची व्हाट्सएपवर नागरिकांकडून महावितरणला माहिती मिळाल्यावर त्वरीत दुरुस्ती करून होणारे अपघात टाळता यावे यासाठी मंडळ स्तरावर व्हाट्सएप नंबर सुरू करण्यात आले असून ग्राहकांनी त्यावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

 

पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. तारा तुटणे, तारांना झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे आदी व इतर कारणांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणाला व्हाट्सएप किंवा एसएमएस द्वारे माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांना व्हाट्सएप नंबरवर फोन करून तत्काळ माहिती देता येईल.

 

पुणे परिमंडळ अंतर्गत रास्तापेठ मंडळ, गणेशखिंड मंडळ व पुणे ग्रामीण मंडळ यासाठी व्हाट्सएप नंबर 7875767123 असून कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर मंडळासाठी 7875769103 व सांगली मंडळ यासाठी 7875769449 तसेच बारामती परिमंडळ अंतर्गत बारामती मंडळ

यासाठी 7875768074, सोलापूर मंडळ यासाठी 9029140455 व सातारा मंडळासाठी 9029168554 व्हाट्सएप नंबर सुरू करण्यात आले आहेत.

 

हे सर्व व्हाट्सएप नंबर दैनंदिन सुनियंत्रण कक्षामध्ये (डीएसएस रुम) उपलब्ध असलेल्या महावितरण कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर सुरू करण्यात आले असून यावर नागरिकांनी माहिती देऊन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

ज्या नागरिकांकडे व्हाट्सएप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे तक्रार केल्यास त्याचेही निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी समन्वयक म्हणून मंडळ कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) व विभागीय कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

 

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात यावे. त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना स्पष्टपणे कळविण्यात यावे. कार्यालयांकडून तक्रारीचे ताबडतोब निवारण केल्यानंतर त्याची माहिती दुरुस्त केलेल्या वीजयंत्रणेच्या छायाचित्रासह दैनंदिन सुनियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी. तसेच संबंधीत तक्रारकर्त्यांना दुरुस्तीचे काम झाल्यासंबंधी दुरुस्तीनंतरचे संबंधीत छायाचित्र व्हाट्सएपवर पाठवून अथवा मेसेज पाठवून अवगत करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये19 सप्टेंबर 2023 ते 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत ,सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेत लखपती दीदी सन्मान सोहळा

पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळांचे महापालिकांमध्ये विलिनीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटकमंडळ क्षेत्रात मिळणार नागरीसुविधांचा लाभ

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन*