vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे 48 तास महत्त्वाचे…

राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे 48 तास महत्त्वाचे…

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. आयएमजडीने (IMD) म्हटले आहे की, पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी रेड तर काही ठिकाण ऑरेंज अलर्ट जारीआहे.

 

राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळधार पडतो आहे. खास करुन कोकण आणि घाटमाथा विभागांमध्ये पुढचे पाच दिवस वरुणराजा अधिक सक्रीय असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभाग द्वारा देण्यात आली आहे. या काळात राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेतो, असेही आयएमडीने (IMD) म्हटले आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी (19 जुलै) सकाळी 8.30 ते शनिवारी (20 जुलै) सकाळी 8.30 या कालावधीत 203.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसाची नोंद तांत्रिकदृष्ट्या 04.05 मिमी पेक्षा अधिक अशी केली जाते. तसेच हा पाऊस अतिवृष्टी निकषात मोडतो. ज्याच्या जवळ मुंबईतील पाऊस जवळपास पोहोचला होता.

हवामान विभागाने म्हटले आहे की, दक्षिण कोकण विभागात पावसाची शक्यता कायम असल्याने त्या ठिकाणी दिलेला ऑरेंज अलर्ट कायम आहे. तर उत्तर कोकणात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहील. दरम्यान, पालघर आणि ठाण्यात मात्र पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्याने त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आाहे

मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागात पुढचे 48 तास अधिक महत्त्वाचे आहेत. घाट माधा परिसरातील पुणे जिल्ह्यातही मुसळधार ते तीव्र स्वरुपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते. शिवाय कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये येत्या बुधवारपर्यंत पावसाची स्थिती कायम आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे

 

 

संबंधित पोस्ट

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; या फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

भाजप  आणि शिवसेनेतील  हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचे शिवसेना  खासदार संजय राऊत.

निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती

हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत नागरिकांना घरावर झेंडा फडकवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ट्विटर वर संदेश

vishwatmaklokswamivarta