vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना…

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्‍यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनाही ते भेटतील.

जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे. राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार आहेत. 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौर्‍यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. आपल्या या दौर्‍यात वाकायामा या शहराला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर 2017 मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

महावितरणच्या जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला*सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न..

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक  यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने सायक्लोथॉनव्दारे व्यापक ‘गर्भाशय कर्करोग जनजागृती’

vishwatmaklokswamivarta

घनकचरा व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण करावे- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा