
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात धारावीतील माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश झाला
मुंबई प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातून काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहे धारावी विभागातील प्रभाग क्रमांक 184 चे माजी नगरसेवक काँग्रेसचे हाजी बब्बू खान, माजी नगरसेवक गंगा कुणाल माने ,भास्कर शेट्टी
काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी शनिवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. हे पाचही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे हे पाचही नगरसेवक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील आहेत. तर इतर दोन नगरसेवक सायन विभागातील आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्वी यांनी पक्ष नेतृत्व बदलत असल्याचे दिसून येत आहे
[ शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आतापर्यंत पंधराहून अधिक माजी नगरसेवक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे यांच्या गटाने आता मुंबईतील काँग्रेसची ताकद कमी करण्याकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यात शीव कोळीवाडा येथील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील वाजिद कुरेशी, धारावीतील भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने यांचाही समावेश आहे. हे पाचही माजी नगरसेवक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील आहेत.



