vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

ऑनलाईनश्रीगणेशमहापूजासोहळा_२०२३

 ऑनलाईनश्रीगणेशमहापूजासोहळा_२०२३ऑनलाईनश्रीगणेशमहापूजासोहळा_२०२३

 

अध्यात्मिक वार्ता

यावेळी गणेशोत्सवाचे अवचित्य साधून एक आगळी वेगळी संकल्पना ALL IN ONE GURUJI या संस्थे मार्फत करण्यात येत आहे

संपूर्ण देशात आणि देशाबाहेरील गणेश भक्तांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी ALL IN ONE GURUJI यांच्या यूट्यूब चॅनेल वरून पहाटे ४.००, ६.००, सकाळी ८.००, १०.०० आणि दुपारी १२.०० या वेळेत मराठी आणि हिन्दी या भाषेतून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून श्री गणेश पूजा आणि प्राणप्रतिश्ठा संपूर्ण पारंपरिक पद्धतीने करण्यात येईल.

वरील दिलेल्या प्रत्येक वेळेस मराठी व हिंदी अश्या दोन्ही भाषेत दोन वेगळ्या पूजेचे लाईव्ह streaming करण्यात येईल.

 

 

ऑल इन वन गुरुजी या संस्थेचे गुरुजी आपला सर्वांनकडून प्रत्यक्ष पूजा करून घेतील.

 

 

सर्वांनी गणेश चतुर्थीला आपला घरी टीव्ही, लॅपटॉप अथवा मोबाईलवर ऑल इन वन गुरुजींच्या यूट्यूब चॅनल लावून आपल्या घरील गणेश मूर्तीची अथवा देवघरातील श्री. गणेशाची एकत्रित पूजा करूया.

 

 

 

या ऑनलाईन महापूजेत सहभागी होऊन सर्व घरातून एकत्रितपणे येणाऱ्या स्वरांचे म्हणजेच मंत्रोपचार, आरती, प्रार्थना आणि अर्घ्य या सुमधुर क्षणांचा आस्वाद घेऊया.

 

 

ज्याप्रमाणे वर्षभर आपण आपल्या लाडक्या गणेश बाप्पाची आपण वाढ बघतो त्यामुळे ह्या वर्षा पासून खास करून आपण तरुण वर्गाने यावेळी आपल्या घरची श्री गणेशाची पुजा स्वतः पुढाकार घेऊन करूया.

 

 

ह्या वर्षीपासून ऑनलाईन गणेश पूजा करण्याचे कारण असे की गणपती बाप्पांची स्थापना ही सर्व समाजात श्रद्धेचा विषय आहे. आपल्या मनातील संकल्पना पूर्ण होण्याकरिता आपल्या घरामध्ये इच्छापुर्तीसाठी श्री. गणपती बाप्पाची मुर्ती स्थापना करावी असा विश्वास आहे.

 

 

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री. गणेशाची स्थापना करण्यासाठी गुरुजींची उपस्थिती आवश्यक असते. परंतु गणेश चतुर्थीला सगळे गुरुजीं सर्व गणेश भक्तांच्या घरी पोहोचू शकत नाही, ही बाब लक्षात घेऊन 19 सप्टेंबर रोजी ALL IN ONE GURUJI डॉट कॉम या संस्थेचे प्रमुख श्री. सचिन कुलकर्णी गुरुजी आणि श्री. सागर धारगळकर (IT Expert) यांनी ही कल्पना उदयास आणली आणि हा ऑनलाईन श्री गणेश महापूजा सोहळ्याचे आयोजन केले आहे.

 

 

संपूर्ण पूजेची सामग्री तसेच पूजेच्या वेळी करण्यात येणारे सर्व नियोजन हे आमच्या अँड्रॉइड ॲप आणि वेबसाईट वर उपलब्ध आहे.

 

 

पूजेला लागणारी सामग्री तसेच चौरंग, पाट, आसने, ताम्ह्नन, तांब्याचे तांबे, पळी, पंचपात्री, स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल.

 

 

ही पूजा अत्यंत सोपी, हळुवार व समजेल या प्रकारे करण्यात येईल. कोणीही यजमान पूजेमध्ये मागे राहणार नाही याची काळजी घेऊन संपूर्ण पूजा करण्यात येईल. प्रत्येक कृती नंतर दहा सेकंद थांबवून पुढची कृती करण्यात येईल. ऑनलाईन यूट्यूब पूजेला सुरू करण्याआधी पूजेची मांडणी कशी करावी त्या साठी गुरुजी आपल्याला समजावून सांगतील. तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य आणि सामुग्री याची यादी गुरुजी प्रत्येक नाव घेऊन सर्व यजमानंकडे जवळपास असल्याची खात्री करून घेतली जाईल. प्रत्येक याजनमांनी आपल्या जवळ एक व्यक्ती मदत करण्याच्या हेतूने सतत जवळ ठेवावा.

 

 

19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला ज्या प्रकारे गणेश पूजा लाईव्ह करण्यात येणाऱ्या आहे त्या पूजेसारखा तसाच भाग आम्ही हिंदी व मराठी भाषेत चित्रीकरण करून आमच्या यूट्यूब चॅनल वर अपलोड केलेला आहे ज्यामुळे यजमानांना 19 सप्टेंबर रोजी करण्यात येणाऱ्या गणेश पूजेची पूर्व कल्पना मिळेल आणि त्या प्रकारे पूजेचे पूर्व नियोजन करण्यास मदत होईल.

[i: गणेश पूजेच्या पूर्व तयारीसाठी आणि मांडणीसाठी कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे याची सर्व माहिती ऑल इन वन गुरुजींच्या वेबसाईट वर प्रसारित करण्यात आलेली आहे. आमच्या यूट्यूब चॅनल ला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून गणेश पूजे संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी आपणास मिळेल.

ALL IN ONE GURUJI चे मराठी आणि हिंदी भाषिक असे दोन्ही गुरुजी संपूर्ण गणेश पूजाविधी देशातील तसेच परदेशातील सर्व गणेश भक्तांकडून एकत्रित ऑनलाइन पद्धतीने करवून घेतील.

ऑल इन वन गुरुजी डॉट कॉम ही एक धार्मिक संस्था आहे. धार्मिक विधी आणि अंत्येष्टी सारख्या पूजा विधी साठी वेगळे गुरुजी आहेत. आमच्या बरोबर शंभर पेक्षा अधिक गुरुजी जोडले गेलेले आहेत आणि आमच्या गुरुजींची संख्या वाढत आहेत. पारंपरिक आणि शास्त्रानुसार पूजा होण्याकरिता आम्ही आमच्या सर्व गुरुजींना वेगळे प्रशिक्षण देतो. जेणेकरून यजमानांना त्यांनी केलेल्या पूजेचे सर्व प्रकारे अध्यात्मिक लाभ मिळू शकेल.

 

सर्व प्रकारच्या धार्मिक पूजाविधी, व्रत, गोंधळ, ज्योतिष, मृतुत्तर कर्म, श्राद्ध अश्या प्रकारच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. ग्राहकांनी आमच्या वेबसाईट तसेच अँड्रॉइड ॲप वरून पूजा बुकिंग करू शकता आणि आमचे सर्व प्रकारचे गुरुजी आपल्या घरी प्रत्यक्ष येऊन पूजा करतील. तसेच वेबसाईट वर सर्व प्रकारच्या पूजेची माहिती, सामग्री तसेच पूजेचे महत्त्व आणि दक्षिणा दिलेली आहे.

यजमानांच्या अधिक माहितीसाठी इतर सर्व पूजेतील काही भागाचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनल वर अपलोड केलेले आहेत. त्यावरून ऑल इन वन गुरुजी या संस्थेच्या गुरुजीची पूजाविधी करण्याच्या प्रकाराबद्दल अधिक कल्पना येऊ शकेल.

19 सप्टेंबर रोजी असणाऱ्या ऑनलाईन गणेश पूजेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा पैसे देण्याचे बंधन नाही. गुरुजींनी ऑनलाईन करवून घेतलेली पूजा आवडल्यास स्व:इच्छेने दिलेली दक्षिणा ऑनलाईन वेबसाईट वरून स्वीकारली जाईल व त्याचे रीतसर बिल दिले जाईल.

(टीप – ऑनलाईन गणेश पूजेसाठी दक्षिणेचे बंधन नाही)

ऑल इन वन गुरुजीच्या यूट्यूब चॅनल, ॲप आणि वेबसाईटला भेट द्या.

संबंधित पोस्ट

श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी ! लेख : दीपावलीचे अध्यात्मशास्त्र- सनातन संस्था–दीपावलीचे अध्यात्मशास्त्र 

vishwatmaklokswamivarta

प्रारब्ध म्हणजे काय ?

 आता आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन… साई प्रशासनाचा अजब निर्णय

vishwatmaklokswamivarta

🌹🙏प्रभात पुष्प🙏🌹

vishwatmaklokswamivarta

ब्रह्मचर्याश्रम

vishwatmaklokswamivarta