vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकाचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकाचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

छत्रपती संभाजीनगर, :- छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

 

यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.

 

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातील दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

vishwatmaklokswamivarta

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज संसद भवनात निरोप समारंभ पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी सह मोठे नेते राहणार उपस्थित

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मुबईत दिवाळीच्या बोनस करिता उद्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट..

vishwatmaklokswamivarta