vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

तंबाखूमुक्त शाळा, शासकीय कार्यालये करण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हा समन्वय समिती बैठकीत निर्देश

तंबाखूमुक्त शाळा, शासकीय कार्यालये करण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हा समन्वय समिती बैठकीत निर्देश

 

ठाणे, प्रतिनिधी- जिल्ह्यातील शाळा व शासकीय कार्यालये व संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा, असे निर्देश आज झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेत देण्यात आले.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत माशाळा, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश वेदपाठक, नोडल अधिकारी डॉ. ऋतुजा महाळुंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

“सलाम मुंबई” या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी या संस्थेने केंद्र शासनाच्या निकषानुसार एका ॲप सुरु केले आहे. या अॅपमध्ये शाळांनी आपली माहिती भरून या उपक्रमात सहभागी व्हावे व यामधील निकषानुसार आपली शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही या बैठकीत सांगण्यात आले. यांतर्गत एप्रिल 2023 पासून 932 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रे तसेच इतर शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये आतापर्यंत 15 तंबाखूमुक्त केंद्र तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी समुपदेशक नेमण्यात आले असून येणाऱ्यांचे तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन करण्यात येते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

जिल्ह्यात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा कायदा 2006) अंतर्गत एप्रिलपासून आतापर्यंत 412 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 71 हजार 410 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे. सर्व महापालिका व इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयात तंबाखूमुक्तसाठी जनजागृती करण्यात यावे, असे जिल्हा दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी यावेळी सांगितले.

 

या बैठकीच्या शेवटी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.

 

00000000

संबंधित पोस्ट

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’; शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे सावकारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

महाराष्ट्र राज्यात एसटीच्या ‘या’ योजनेला पुन्हा मुदतवाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा…

महाराष्ट्रातील तारापूर येथे  भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 कर्मचारी जखमी.

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…