vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

क्षयरोगमुक्त भारत अभियानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे – डॉ. तानाजी सावंत

क्षयरोगमुक्त भारत अभियानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे – डॉ. तानाजी सावंत

 

पुणे, प्रतिनिधी : क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी क्षयरोग प्रशिक्षकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे असून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात सामावून घ्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय क्षयरोग प्रशिक्षकांकरीता पहिल्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभाप्रसंगी केले.

 

औंध येथील राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाचे अतिरिक्त उपसंचालक डॉ. संजयकुमार मट्टू, सहसंचालक (क्षय व कुष्ठरोग) डॉ. सुनिता गोल्हाईत, उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संदिप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध देशपांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय दराडे आदी उपस्थित होते.

 

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यत क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी अशा पद्धतीचे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. क्षयरोग निर्मुलनासाठी सर्व माहिती असलेले क्षयरोग प्रशिक्षक तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण अधिकाधिक कर्मचाऱ्यांना देऊन राज्यासह देश क्षयरोग मुक्त करण्याचा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

 

डॉ. मट्टु म्हणाले, क्षयरोग प्रशिक्षणासाठी देशातील अग्रगण्य संस्थांची निवड करण्यात आली आहे. देशात सध्या पाच क्षयरोग प्रशिक्षण केंद्र असून, त्यात पुण्यातील क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी वेगवेळ्या 9 राज्यातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले.

 

00000

संबंधित पोस्ट

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी,आयुष्मान कार्ड आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जन आरोग्य योजना सर्वांसाठीच ठरणार जीवनदायी

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ ठाणे – सशक्त भारताचा संकल्प..!ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत उजाडले नवे पर्व सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्तसंकलन वाहिनी देणगी स्वरूपात झाली उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

‘सिकलसेल मुक्त’साठी ‘अरुणोदय’ मोहिम*आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

vishwatmaklokswamivarta