vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणला माथाडी कामगारांचा भक्कम पाठींबा, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणला माथाडी कामगारांचा भक्कम पाठींबा, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे

नवीमुंबई, प्रतिनिधी :- कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी ८० व्या शतकामध्ये चळवळ उभी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ही चळवळ आतां पुन्हा सक्षमपणे उभी रहात असून, या चळवळीला व मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणला तमाम माथाडी कामगारांचा भक्कम पाठींबा असून, राज्य सरकारने आतां मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी विशेषतः मनोज जरांगे-पाटील यांच्या व महाराष्ट्रभर सुरु असलेल्या आमरण उपोषणाला तमाम माथाडी कामगारांनी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील दिवसभर कामे बंद ठेऊन पाठींबा व्यक्त करण्यासाठी नव्यामुंबईतील माथाडी भवन येथे सभा आयोजित केली होती, या सभेला आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, कार्यकर्ते सर्वश्री अजय इंगुळकर, जितेंद्र येवले, दिनकर सनुगले, बबन संकपाळ, नाना धोंडे, संभाजी बर्गे, सुरज बर्गे आदींची भाषणे झाली, सभेचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नव्यामुंबईतील पाचही मार्केट आवारातील कामे बंद ठेऊन कामगार, पालावाला महिला, मेहता कर्मचारी, वारणार, मापाडी कामगार सभेला उपस्थित होते. या सभेला युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बालसाहित्यिकांची कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शन वाचन हे एकमेव व्यसन ज्यामुळे माणूस वाचतो- ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड

vishwatmaklokswamivarta

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

मुंबई लोकल ट्रेन -:आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला-वित्त-नियोजन व उत्पादनशुल्क विभागाचा आढावा…करचोरी, करगळती रोखण्याबारोबर परिणामकेंद्रित काम करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न