vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

धनगर आरक्षण मुद्दा :जालना दगडफेक प्रकरणी 36 आरोपींची ओळख पटली.

धनगर आरक्षण मुद्दा :जालना दगडफेक प्रकरणी 36 आरोपींची ओळख पटली..

 

राज्य प्रतिनिधी

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले होते. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा ‘एफआयआर’ समोर आला असून, यात एकूण 36 आरोपींचे नावं समोर आली आहे. 

जालना दगडफेक प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, गांधीचमन येथून निघालेला मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी अचानक काही लोकांच्या जमावाने आरडाओरडा करत आणि शिवीगाळ करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या जमावाला शांततेचे आवाहन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या आवाहनाला कोणतेही प्रतिसाद म देता या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाहेरील मेन गट उखडून फेकला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर या जमावाने शासकीय वाहनांच्या काचा फोडल्या, दुचाकींची तोडफोड केली,झाडांच्या कुंड्यांची तोडफोड केली, दगडफेक करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी ही बातमी एबीपी माझावर ही आलेली आहे

 

 

संबंधित पोस्ट

अस्तित्व संस्था-ठाणे यांनी महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित ‘अंधे जहां के अंधे रास्ते’ हे दोन अंकी नाटक

vishwatmaklokswamivarta

आचारसंहिता भंगाच्‍या तक्रारींसाठी-सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल फ्रि क्रमांक उपलब्ध..  

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा..

कुंभेफळ येथील कला केंद्र बंद करा महिला काॅंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची मागणी..

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरु. 288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता