vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

केंद्रीय पथकाकडून अंबड, मंठा, बदनापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून अंबड, मंठा, बदनापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी

 

 

 

जालना, प्रतिनिधी:- केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने आज जिल्ह्यातील अंबड, मंठा व बदनापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांचा समावेश होता.

 

गुरुवार दि.14 डिसेंबर 2023 रोजी या पथकाने सकाळी अंबड तालुक्यातील ताडहदगाव, खडकेश्वर प्रकल्प, पांगरखेडा, डावरगाव, वालखेडा तसेच मंठा तालुक्यातील मेसखेडा, जाटखेडा आणि वाढेगाव पांढुर्णा, जालना तालुक्यातील पिंपरी डुकरी यासह दुपारनंतर बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी व तुपेवाडी या गावालगत असणाऱ्या शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन सद्यस्थितीतील पिक परिस्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणी दरम्यान पथकासमवेत अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. कांबळे, तहसीलदार श्री. शेळके, रुपा चित्रक, छाया पवार आदींसह कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा-कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 29.48 टी.एम.सी.पाणीसाठा,कोयना धरणातून 52 हजार 100 तर वारणा धरणातून 11 हजार 575 क्युसेक्स विसर्ग..

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुनरुच्चार, नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे केले आवाहन

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने, सोईस्कर आणि प्रभावी निवारण करण्यासआपले सरकार तक्रार निवारण प्रणाली    –जिल्हाधिकारी किशन जावळे 

vishwatmaklokswamivarta

महारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ प्रचार वाहनास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta