vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता,ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी दि.15 जानेवारी पर्यत मुदतवाढ…

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता,ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी दि.15 जानेवारी पर्यत मुदतवाढ…

 

रायगड प्रतिनिधी- पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि.31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी. ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोदणी पुरेशी झाल्याचे न दिसल्याने शासनाने या बाबीचा विचार करुन या चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात शेतकरी नोंदणी व्हावी, म्हणून पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता, दि. 15 जानेवारी 2024 अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली आहे.

 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

 

००००००००

संबंधित पोस्ट

मतदानाच्या जनजागृतीसाठी व्यापारी, उद्योजक, डॉक्टरांचा सहभाग आवश्यक– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 

मराठवाड्यातील एकमेव… प्रात्यक्षिक शिक्षण प्रणालीद्वारा-विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित समर कॅम्प* चे आयोजन

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

भीम आर्मीतर्फे रविवारी जयभीम एकता परिषद उपस्थित राहण्याचे सतीश पवार यांचे आवाहन

शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेयआमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले यश …

vishwatmaklokswamivarta