vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबईत 27 ते 29 जानेवारीदरम्यान विश्व मराठी संमेलनाचे आयोजन- मंत्री दीपक केसरकर

नवी मुंबईत 27 ते 29 जानेवारीदरम्यान विश्व मराठी संमेलनाचे आयोजन- मंत्री दीपक केसरकर

 

नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन राज्य शासनामार्फत केल्याने त्यात सातत्य राहणार आहे. यापुढे दरवर्षी हे संमेलन आयोजित करण्यात येईल.

महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. येत्या 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पूर्व तयारीचा मंत्री केसरकर यांनी आढावा घेतला.

 

केसरकर म्हणाले, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन राज्य शासनामार्फत केल्याने त्यात सातत्य राहणार आहे. यापुढे दरवर्षी हे संमेलन आयोजित करण्यात येईल. केवळ परदेशातील नागरिकांसाठी हे संमेलन नसून महाराष्ट्रासह देशातील बृहन्महाराष्ट्र मंडळे तसेच परदेशातील विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी काम करणाऱ्यांना एकत्र येता यावे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबविता यावेत, या उद्देशाने हे आयोजन होत आहे. देशाबाहेरील अमेरिका, युरोप, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आदी देशांमधून सुमारे 500 तर भारतातील सुमारे एक हजारांहून अधिक मराठी भाषा प्रेमी नागरिक येण्याची अपेक्षा आहे

संबंधित पोस्ट

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

vishwatmaklokswamivarta

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

धारावीकरांना धारावीतच घर मिळणार धारावीचा विकास चे विजन पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन धारावीतील शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवार राजेश खंदारे यांना विजयी करण्याचा आव्हान

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात चर्चा महायुती चा मुख्यमंत्री कोण? 

vishwatmaklokswamivarta

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी-महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta