vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नोंदणीकृत कलापथक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे दरपत्रकासह प्रस्ताव द्यावेत

नोंदणीकृत कलापथक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे दरपत्रकासह प्रस्ताव द्यावेत

 

ठाणे प्रतिनिधी : कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दीसाठी जिल्हयातील नोंदणीकृत पथनाट्ये/ कलापथक संस्थांनी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव दरपत्रकासह 01 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

 

कार्यालयाला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दी करणे या बाबीसाठी निधी मंजूर आहे. जिल्ह्यामध्ये कलापथक सादर करण्यासाठी कार्यालयाकडून पथनाट्ये /कलापथक संस्थांची निवड करण्यात येत आहे. निवड झालेल्या कलापथक/पथनाट्ये संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची सर्वांना एकसमान या तत्वाने संधी देण्यात येणार असून त्यासाठी योग्य ते मानधन देण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील कलापथक/पथनाट्ये संस्थांनी कार्यालयाकडे पुढील कागदपत्रे 30 जानेवारी 2024 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत व्यक्तीश: सादर करावीत.

 

संस्था नोंदणीकृत असल्यास त्याची कागदपत्रे , संस्था किती वर्षापासून कार्यक्रम करीत आहे त्याचा तपशील व पुरावे, संस्थेने एका वर्षात सरासरी किती कार्यक्रम सादर केले आहेत, त्याबाबतची माहिती व पुरावे, शासकीय योजनांसाठी कार्यक्रम केल्याचे अनुभव वर्षे/संख्या, आकाशवाणीवर कार्यक्रम केल्याचा अनुभव वर्षे/संख्या व त्याबाबतचे पुरावे, केंद्र शासनाच्या गीत व नाट्य प्रभाग यांच्या यादीवर पथक आहे का, किंवा पुर्वी होते का, असल्यास याबाबतचा पुरावा, संस्थेच्या पथकातील सहभागी कलाकारांची कला क्षेत्रातील पूर्व अनुभव (वर्ष/व्यक्तीगत सादरीकरण संख्या), पथकाला/पथकातील कलाकारांना मिळालेले शासकीय अथवा प्रथितयश पुरस्कार याबाबतचा पुरावा, पथकातील सर्व कलावंतांची नावे व पत्ता आधार क्रमांक व ई-मेल आयडी आदी माहिती प्रस्वावासोबत सादर करावा.कोणत्याही स्तरावर ही प्रक्रीया रद्द करण्याचे अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय स्वत:कडे राखून ठेवत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, स्टेट बॅंक ऑफ इंडिया इमारतीवर, दुसरा मजला, जिल्हाधिकारी आवार, कोर्ट नाका, ठाणे (प),दू.क्र. ०22-25342362 अथवा 25303859 या दूरध्वनीवर किंवा 8779067109 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

 

000000000

 

वृत्त क्र.76/2024

संबंधित पोस्ट

ठाणे २५ लोकसभा निवडणूकीसाठी आजपासून सुरू होणाऱ्या नामनिर्देशन प्रक्रियेसाठी टीम सज्ज

जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला भरती, मुंबई पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

बालकांचे संरक्षण, संगोपन व पुनर्वसन करण्याबाबत-गठित समितीची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत ६ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी जिल्ह्यात कातकरी कुटुंबांचे सर्व्हेक्षण युध्द पातळीवर सुरू१२ हजार २३७ घरकुलासाठी पात्र कातकरी कुटुंबियांना मिळेल पक्के घर…