vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाप्रित’ च्या विशेष कार्य अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

महाप्रित’ च्या विशेष कार्य अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

 

 

            मुंबई, ‍‍ प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

श्री. श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित” (महाप्रित)” या नावाची सहयोगी उप कंपनीची, कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत स्थापन झाली. महाप्रित या उप कंपनीमार्फत बदलत्या काळाची गरज, मागास व दुर्बल समाजाच्या गरजा व वाढत्या आकांक्षा लक्षात घेऊन, केंद्र व राज्य शासनाची विविध उद्दिष्टे, योजना व उपाय योजना एकत्रित करुन मागासवर्गीय समाजाच्या सर्व समावेशक विकासासाठी ‘नवयुग योजना’ आखली आहे. या उपकंपनीच्या सहभागाने शासन ते शासन (Govt. to Govt.) प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत महाप्रित या उप कंपनीमार्फत ठाणे महानगर पालिका क्षेत्रात (टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर) एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत समूह विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यभरात इतर अनेक महत्वपूर्ण प्रकल्प ‘महाप्रित’ मार्फत राबविण्यात येणार आहेत.

 

0000

संबंधित पोस्ट

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवसमूह पुनर्विकास करावा

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाचा दणका, अवैध बांधकाम पाडण्यासोबतच 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यात “सेवा पंधरवडा”अभियानाचा अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते शुभारंभ- “महसूल योजना वाहिनी”स हिरवा झेंडा…

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

रमजान निमित्त भामला फाउंडेश तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप*

vishwatmaklokswamivarta