vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महासंस्कृती महोत्सवात आज 17 फेब्रुवारीला होणार राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगिते, शिवगीते व नृत्याचा जोशपूर्ण कार्यक्रम अलका कुबल, साधना सरगम, प्रा.राजेश सरकटे, वैशाली माडे हे राहणार उपस्थित भारुडकार, शाहीर सादर करणार लोकरंग कार्यक्रम सर्वांना विनामुल्य प्रवेश

महासंस्कृती महोत्सवात आज 17 फेब्रुवारीला होणार राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगिते, शिवगीते व नृत्याचा जोशपूर्ण कार्यक्रम अलका कुबल, साधना सरगम, प्रा.राजेश सरकटे, वैशाली माडे हे राहणार उपस्थित भारुडकार, शाहीर सादर करणार लोकरंग कार्यक्रम सर्वांना विनामुल्य प्रवेश

 

 

राज्य प्रतिनिधी :- महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी वंदे मातरम या राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीते, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रमाने महासंस्कृती महोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका साधना सरगम, सुप्रसिध्द गायक वैशाली माडे, प्रा. राजेश सरकटे व संच, गायक रवींद्र खोमणे, मुनव्वर अली आणि सुप्रसिध्द कोरिओग्राफर संतोष भांगरे हे राहणार आहेत.

 

शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरु होणाऱ्या महोत्सवाच्या प्रारंभी जालना लोकरंग कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये प्रसिध्द भारुडकार मीरा उमप व संच, संतोष वाघ आणि संच, गजानन लेखणार आणि संच, शाहिर विजय मघाडे, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहिर नानाभाऊ परिहार व संच, शाहीर मिर कावळे, शाहीर विजय काटे, शाहीर बाबु सेवा राठोड व संच यांचा भारुड व शाहीरीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 6:30 वा. समारोप कार्यक्रमातंर्गत वंदे मातरम हा राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीतांचा, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मसुदा दाखल; 24 जुलै रोजी होणार सुनावणी…

दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

Congress: राहुल गांधींच्या 41 हजारांच्या टीशर्ट वरुन भाजप विरुध्द कॉंग्रेस ट्वीटर वॉर

vishwatmaklokswamivarta

व्यायामशाळा बांधकामाच्या अनुदान रकमेत वाढ पात्र संस्थांनी लाभ घ्यावा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्यांची सत्ता स्थापन करून एक आदर्श राजाबरोबरच एक आदर्श समाज घडविला-l- ह.भ.प. शितलताई साबळे-पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे राखीव

vishwatmaklokswamivarta