vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तृतीयपंथीयांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सामाजिक संस्थांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सामाजिक संस्थांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

सांगली प्रतिनिधी: शासन स्तरावरून प्राप्त आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचे सर्व्हेक्षण करावयाचे आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सामाजिक संस्थांनी विहीत नमुन्यामध्ये अर्ज भरून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 अखेर समक्ष उपस्थित राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगांव रोड, सांगली (दूरध्वनीक्रमांक 0233- 2374739) येथे सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

 

सर्व्हेक्षण करण्यासाठी निवडण्यात येणारी संस्था तृतीयपंथीयांसाठी काम करणारी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. सर्व्हेक्षणबाबत मान्य संस्थेला शासन नियमानुसार निश्चीत केलेला आर्थिक लाभ दिला जाईल. माहिती भरण्यासाठीचा विहीत नमुना अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली या कार्यालयात उपलब्ध असून दि.16 ते 21 फेब्रुवारी पर्यंत विनाशुल्क उपलब्ध करून दिला जाईल. अर्ज नमुना वितरीत करणे व अर्ज स्विकारण्यासाठी शासकीय सुट्टीच्या दि. 17 ते 19 फेब्रुवारी 2024 रोजीही कार्यालयीन वेळेत कार्यालय सुरू ठेवण्यात येत आहे. तरी सामाजिक संस्थांनी आपले अर्ज सादर करावेत.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक लखपती दिदी; ७३ हजार ७४१ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी

vishwatmaklokswamivarta

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२५ मधील महाराष्ट्र दालनाचे १४ नोव्हेंबरला उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाचे १५ नोव्हेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही; तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta