vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

शेतकरी आणि ग्राहकांसाठी पणन महासंघाची कामगिरी अभिमानास्पद- पणन मंत्री अब्दुल सत्तार

शेतकरी आणि ग्राहकांसाठी पणन महासंघाची कामगिरी अभिमानास्पद- पणन मंत्री अब्दुल सत्तार

 

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी पणन महासंघाने शेती, शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी त्यांच्या हित संरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. महासंघ शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवित असून पणन महासंघाने शेतकरी व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविला असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी श्री.सत्तार बोलत होते.यावेळी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, महासंघाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि राज्यातील महासंघाच्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी पणन मंत्री श्री सत्तार म्हणाले, महासंघ धान, भरडधान्य, कडधान्य व तेलबिया खरेदी आणि खत व पशुखाद्य विक्रीचे काम करत आहे. शेतमालाला चांगला व योग्य भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य, तेलबिया कडधान्ये यांची केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीने राज्यात खरेदी केली आहे. नाफेड, शासन व एफ.सी.आय.करिता पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबिया खरेदी झालेली आहे .आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. महासंघ राज्यात सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध खत पुरवठा करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडत आहे.

 

सहकारी संस्था चालविण्यासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.संस्था सभासदांनी दिलेल्या निवेदनावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल.ज्या संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना व्यवसायिक स्वरूप देण्याचा विचार केला जाईल. सहकार सक्षम राहिला पाहिजे.महासंघाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न करावेत, शासन त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल असेही श्री.सत्तार यांनी यावेळी सांगितले.

 

पणन महासंघाच्या 65 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेतील सर्व विषय मंजूर करण्यात आले. पणन मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी संस्था प्रतिनिधींची निवेदने स्वीकारली.

 

00000

संबंधित पोस्ट

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

भगवान महावीर 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेअंतर्गत दिलेले मालमत्ता कार्ड-कर्जासाठी वैध दस्ताऐवज- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

माजी राज्यमंत्री #बाबासिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta