vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानाबाबत जनजागृती

घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानाबाबत जनजागृती

 

        जालना, प्रतिनिधी :- नेहरु युवा केंद्र, व संत भगवान बाबा युवा मंडळ यांच्या वतीने मतदान जनजागृती, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी मंठा व परतुर या तालुक्यामध्ये घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच घोषवाक्याच्या माध्यमातून करा आपल्या मताचे दान हीच आहे लोकशाहीची शान, 18 वर्षाची वय केली पार करुन घ्या मताचा अधिकार, तुमचा हक्क तुमचं मत, अशी घोषवाक्ये व त्याला साजेशी चित्रे रेखाटत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच स्वयंसेवकांनी रेखाटलेली घोषवाक्ये मंठा व परतुर तालुक्याच्या विविध ठिकाणी काढण्यात आली. यावेळी वैभव कांगणे, रवि कांगणे, सतुबा बोंडे, श्रावण बोंडे, सुरेश कांगणे, रामकिसन कांगणे, महादेव कांबळे, अनिकेत जगदाळे, योगेश काळुंखे, लक्ष्मण राऊत, रोहित भापकर इत्यादींच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली. अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

संबंधित पोस्ट

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयामार्फत जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. 2023 परिक्षेचा निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ; सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी

vishwatmaklokswamivarta

नद्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करा-पालकमंत्री ना. मकरंद पाटील· अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करा· दिवाळीआधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत· जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न· प्रशासकीय मान्यता पूर्ण करा

vishwatmaklokswamivarta

यावर्षी 2022 पहिल्या सात महिन्यात पुण्यात तब्बल 840 महिला बेपत्ता… मुस्कान योजनेअंतर्गत महिलांचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मोरारी बापू यांची राम कथा ऐकणे म्हणजे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta