vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ साकारण्यात येणार

मुंबई – वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन 2-बीच्या खाली बॉलिवूड थीम साकारण्यात येणार आहे. ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान 7 स्टेशन आहेत. त्यामधील 355 खांब व त्यामधील जागेमध्ये एमएमआरडीएमार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बॉलीवूड थीम साकारण्यात येणार आहे.

बॉलिवूड थीमद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. अत्यंत अनोखी अशी ही कल्पना या परिसराचे सौंदर्य तर वाढवणारी ठरणार आहेच.

वांद्रे पश्चिम येथे असणारे बॅन्ड स्टँड, माऊंट मेरी आणि अन्य चर्च, वांद्रे किल्ला, जुन्या आठवणी जपणारे वांद्रे रेल्वे स्टेशनसह हा संपूर्ण परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरणारा आहे.

बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते याच भागात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्मस्टार यांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते.

उद्योग-व्यवसाय आणि देशाच्या अर्थकारणामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बॉलीवूडचा गेल्या 100 वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पद्धतीने बॉलीवूड थीम साकारण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

अनिल अंबानी समूहाशी संबंधित ३,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त अंमलबजावणी संचालनाययाने – ईडी ची कारवाई ..

vishwatmaklokswamivarta

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

vishwatmaklokswamivarta

कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी 862 कोटी 29 लाख रूपयांची तरतूद

अनधिकृत श्री चैतन्य टेक्नो स्कुल  शाळेला 1 लाख रुपयांचा ठोठावला दंड