vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

अर्थव्यवस्था धावली प्रचंड वेगाने, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बाब; तिसऱ्या तिमाहीत तब्बल 8.4% ची जीडीपी ग्रोथ..

 

 

व्यावसायिक प्रतिनिधी

वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनातली (GDP) मजबूत 8.4% वाढ झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, हा वेग विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मागील तिमाहीतील 8.1 टक्के वाढीपेक्षा हे प्रमाण खूप जास्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याच कालावधीसाठी 6.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. जीडीपीमध्ये मजबूत वाढ हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक लक्षण आहे

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याच कालावधीसाठी 6.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. जीडीपीमध्ये मजबूत वाढ हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक लक्षण आहे. अर्थव्यवस्थेच्या या वेगानंतर 2023-24 या आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाजही बदलण्यात आला आहे. पूर्वीच्या 7 टक्क्यांच्या तुलनेत तो 7.6 टक्के करण्यात आला आहे. तिसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 6.6 टक्के दराने वाढेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, हे सर्व अंदाज फोल ठरले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीडीपीच्या स्फोटक आकडेवारीवर प्रतिक्रिया दिली. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि क्षमता दर्शवते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वेगवान आर्थिक विकासासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, ज्यामुळे 140 कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी मदत होईल, याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी केला

संबंधित पोस्ट

जागतिक व्यापार क्षेत्रातील मंदीवर मात करत भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यात वाढीचा वेग कायम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा इच्छूक उमेदवार,आस्थापना,उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा

गैरप्रकार रोखण्यासाठी डीबीटी व ऑनलाईन निवड प्रक्रिया- मंत्री जयकुमार गोरे

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

कलेचे रूपांतर झाले केश कर्तनालयातआदिवासी राजेश भलाची स्वयंरोजगारातून सुरू झालीआर्थिक उन्नतीकडे वाटचाल…

vishwatmaklokswamivarta

पीक कर्ज वितरण, बियाणे खते उपलब्धतेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा