vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार मेळावा”दि.6 व 7 मार्च 2024 रोजी

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार मेळावा”दि.6 व 7 मार्च 2024 रोजी

 

 

 

ठाणे, प्रतिकृती- कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 6 व 7 मार्च 2024 रोजी मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या बेरोजगार युवक-युवतींसाठी तसेच इतर बाबींविषयीचे आवश्यक ते सर्व नियोजन योग्य प्रकारे करावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे दिल्या.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशान्वये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्यामार्फत कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन दि. 6 व 7 मार्च 2024 रोजी मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे या नियोजित मेळाव्याच्या ठिकाणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मेळाव्याच्या दृष्टीने पूर्वतयारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कौशल्य विकास उपायुक्त दिलीप पवार, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, दीपक चव्हाण, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, पोलीस विभाग सहायक आयुक्त श्री. गजानन काब्दुले, कौशल्य विकास सहायक आयुक्त संपत चाटे, ठाणे कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे, तहसिलदार उमेश पाटील, रत्नागिरी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त इंदुजा शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, मंगेश देसाई आणि इतर संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवक-युवतींची संभाव्य आकडेवारीची माहिती घेवून त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळी पाणी, मोबाईल स्वच्छतागृह, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, त्याचप्रमाणे विविध विभागांचे येणारे अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था व्यवस्थित करावी. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, याकरिता मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नमूद केलेल्या उपाययोजना करण्यात याव्यात. तात्पुरते रुग्णालय उभारून त्यामध्ये प्रथमोपचार, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती, आवश्यक बेड्स, औषधे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार कराव्यात. सायनिंग बोर्ड लावावेत. पार्किंगच्या ठिकाणीदेखील पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करावी. महारोजगार मेळाव्यास येणाऱ्या युवक-युवतींना नेमके कुठे व कसे जायचे, याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत, अशाही सूचना दिल्या.

 

या मेळाव्यात 352 स्टॉल्स असणार आहेत. दि.6 मार्च 2024 रोजी 1 हजार 74 कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये 56 हजार 120 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच दि.7 मार्च 2024 रोजी 1 हजार 45 कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये 44 हजार 774 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

मुंबईमध्ये आज 1 मार्चपासून बेस्टच्या सुपर सेव्हर बस पास दरांमध्ये 5-10% सुधारणा; जाणून घ्या नवे दर

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ऑटोरिक्षा व तीनचाकीसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका..

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

शेतीसंबंधित शंका निरसन व मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचे टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअप क्रमांक कार्यान्वित..

वसई येथील घटना: चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत तरुणाचा निसटला पाय, आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण,