
शिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल..
राज्य प्रतिनिधी जालना : तुपेवाडी (ता.बदनापूर) येथील शिवशक्ती आश्रमात महाशिवरात्र महोत्सव सोळयानिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळयाचे दि.2 पासून आयोजन करण्यात आले आहे. प.पु.ब्रम्हलीन नागाबाबा यांच्या आशिर्वादाने व प.पु.बालयोगी खडेश्वरी बाबा यांच्या प्रेरणेने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून हे या सोहळ्याचे पंचवीसावे वर्षे आहे. सेाहळयात दररोज किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून हर हर महादेवाचा गजर होत असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळयात विविध धार्मीक कार्यक्रम होत असून समाज प्रबोधन व सामाजिक उपक्रम राबवत प्रभू श्रीराम मंदिराचा जिर्णोध्दारतून त्रिवेणी संगम साधला जात आहे. सोहळयाला महराष्ट्रातील नामवंत संत महंत उपस्थित राहून किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहे. सोहळयात ह.भ.प. जनार्दन महाराज राजपुत, अनिरूध्द महाराज राजपुत, शिवचरित्रकार गजानन महाराज देठे, महामंडलेश्वर कृष्ण चैतन्यपुरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर, पुरूषोत्तम महाराज पाटील, वैजीनाथ महाराज थोरात, अमोलानंद महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळयात भाविकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ अन्नदात्याकडून भोजनाची सोय करण्यात आली आहे. सोहळयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळयात धार्मीक कार्यक्रम, समाजप्रबोधन, सामाजिक उपक्रम राबवून त्रिवेणी संगम साधण्यात येत आहे. अलिकडे प.पु.खडेश्वरी बाबा यांच्या प्रेरणेने होत असलेल्या सोहळयात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. 9 मार्च रोजी काल्याचे किर्तन होवून महाप्रसाद वाटपाने सोहळयाचा समारोप होणार आहे. पंचक्रोशितील भाविकांनी सोहळयाचा लाभ घेण्याचे आवाहन प.पु.खडेश्वरी बाबा, व्यवस्थापक देवा बाबा यांच्यासह तुपेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
आश्रम म्हंटले की, केवळ ईश्वरांची भक्ती, आराधना, मनःशांती, धार्मिक शिक्षण, सण- उत्सव, एवढ्या पुरतेच मर्यादित दिसतात. मात्र यापुढे जाऊन अध्यात्मासोबतच माणसातला देव शोधावा, अंधश्रद्धेविषयी प्रबोधन, पर्यावरण रक्षण, रक्त संकलन, गौसेवा, जाश्रमांच्या देणग्यांचा सदुपयोग हा गोर-गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण, सामूहिक विवाह, रुग्णांना दर महिन्यास फळे वाटप, जशा लोकोपयोगी उपक्रमांवर खर्च करुन जनमाणसांत शिवभक्तीसह मानव सेवेची रुजवण करण्याची किमया महंत बालयोगी पवन भारती खडेश्वरी बाबाजी यांनी करून दाखवली. त्यानी स्थापन केलेला शिवशक्ती आश्रम हा सर्व जाती-धर्मीयांसाठी एकता, प्रबोधन, जाणि अध्यात्माचे केंद्रबिंदू बनला आहे. जालना ते श्रीक्षेत्र राजुर मार्गावर जालना शहरापासून 20 किलो मिटर अंतरावर जसलेल्या तुपेवाडी (ता. बदनापूर) येथे रस्त्यालगतच निसर्गाच्या सानिध्यात पाच एकर विस्तीर्ण परिसरात जसलेल्या शिवशक्ती आश्रमात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यानिमित्त शिवलीलामृत ग्रंथ पारायण, श्रीमद् भागवत कथा, गाथा भजन, हरी कीर्तन, हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून पंचक्रोशीसह दूरवरून दररोज हजारो भाविक कथा श्रवण, दर्शनासाठी येतात. महंत खडेश्वरी बाबा यांनी सांगितले. महाशिवरात्री, श्रावण मास, गुरुपौर्णिमेला येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे हरिनाम सप्ताह अतर्गत नुकतीच आश्रम परिसरात शिव-पार्वती माता, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती मुर्ती, संत सेवालाल महाराज, महत गुरुवर्य किसन भारती, नागा बाबा, अशा पाच मुर्त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. मंदिराच्या कळसालगत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूठ मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाशिवरात्रीनिमित्त नेत्र तपासणी, मोतीबिंदू व बिन टाक्याचे ज्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सलग बारा वर्षे खाली न बसता पायावर उभे राहून तपश्चर्या केलेले महंत बालयोगी पवन भारती खडेश्वरी बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमात वर्षभर गौसेवा, अन्नक्षेत्र, आरोग्य शिबिरे, ज्ञानदान, वृक्षारोपण, नित्य चतुथीं अन्नदान, संत-महतांची सेवा, सर्व जाती-धर्मातील राष्ट्रसंत, हुतात्मे, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी, गोरगरीब मुला-मुलीसाठी शैक्षणिक सहकार्य जसे उपक्रम चालतात. आतापर्यंत परिसरातील गौ सेवकांना गाई वितरित करण्यात आलेल्या जाहेत. तर येथे असलेल्या गाईंना सकस, धष्टपुष्ट आहार दिला जातो, अशी माहितीही महंत पवन भारती खडेश्वरी बाबाजींनी दिली राजूरजवळ असलेल्या पारधी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना वेळोवेळी गरजेनुसार शैक्षणिक साहित्य, मदत केली जाते, तर दरवर्षी पळसखेडा (ता. चिखली) येथील सेवा संकल्प जाश्रमात 190 मनोरुग्णांना दिवाळीची भेट म्हणून किराणा, स्वेटर, कपडे, वितरित करुन दिपावली साजरी केली जाते तसेच आश्रमातर्फे आतापर्यंत 117 सामुहिक विवाह लावण्यात आले आहेत, असे सागून आश्रमातील पिकलेल्या फळासोबतच विकत घेऊनही फळे जिल्हा सामान्य रूग्णालय, महिला व बाल रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर (औरगाबाद) येथील घाटी रुग्णालयात पाठवली जातात. या शिवाय तीन वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त भागात मदतीसाठी संस्थानतर्फे 25 हजाराचा धनादेश देण्यात आला होता. सामाजिक दायित्वातून असे लोकोपयोगी उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असल्याने शिवशक्ती आश्रम मानवजातीस शक्ती स्थान बनले आहे.



