vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

निवासी उद्योजकता शिबीरात हिमरुशाल निर्मिती प्रशिक्षण महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे

निवासी उद्योजकता शिबीरात हिमरुशाल निर्मिती प्रशिक्षण महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- हिमरु शाल निर्मिती प्रशिक्षणाद्वारे हिमरु शाल निर्मितीच्या कलेस पुनरुज्जीवीत करुन महिलांनी उद्योजक व्हावे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करुन असे आश्वासन राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण येथे दिले.

 

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे आयोजित हिमरु शाल निर्मितीचे महिलांसाठी प्रशिक्षण ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन पैठण येथे करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी डी.यु. थावरे, प्रकल्प अधिकारी भारती सोसे, पुष्पाताई गव्हाणे, सोमनाथ परदेशी, वैशाली परदेशी, तुषार पाटील, विनोद तुपे, प्रतिभा निमकर तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

 

पालकमंत्री भुमरे म्हणाले की, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. हिमरु शालचे पुनरुज्जीवन करावे. यशस्वी महिला उद्योजक व्हावे. हिमरु शाल उत्पादनाच्या विक्रीसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण येथे मंजूर आराखड्यात पैठणी व हिमरु शाल विक्रीसाठी प्रशिक्षित महिलांना गाळे उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन त्यांनी दिले. डी. यु. थावरे यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले.

संबंधित पोस्ट

शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात श्री जीवदानी देवी मंदिर, विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण: अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आस्थापनांसाठी कार्यशाळा

जम्मू काश्मीर नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न फसला, भारतीय लष्कराकडून एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान