vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सातारा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे अंतर्गत 56 उद्योजकांकडून1 हजार 150 कोटींचे सामंजस्य करार

सातारा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे अंतर्गत 56 उद्योजकांकडून1 हजार 150 कोटींचे सामंजस्य करार

 

 

सातारा, प्रतिनिधी : मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठी ची पूर्व तयारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे अंतर्गत सातारा जिल्ह्यात छोटया उद्योजकांपासून मोठया उद्योजकांनीही गुंतवणुक करण्याकरिता पुढाकार घेतला. परिषदेमध्ये एकूण 56 प्रस्तावित उद्योगातून 1 हजार 150 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून सातारा जिल्ह्यात भविष्यात 2 हजार 800 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

 

मास भवन विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मास भवन, सातारा येथे संपन्न झाली. यावेळी पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, मास सचिव धैर्यशील भोसले उपस्थीत होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. औद्योगीक दृष्ट्या अविकसित भागात उद्योजकांनी गुंतवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले.

 

सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्रातही मोठ्या रोजगाराच्या मोठ्या संधी असून त्याकडे जिल्ह्यातील उद्योजकांनी एक संधी म्हणून पाहावे. त्याबरोबरच उद्योगांना कोणतीही मदत आवश्यक असल्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सांगितले.

 

या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे विविध उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.

 

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक : निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

सहकार पुरस्कार; सहकारी संस्थांकडून 18 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय; गुणांकनाच्या कोणत्याही अटीशिवाय नक्षलवादी युवक-युवतींना ‘आयटीआय’ला प्रवेश

ग्रा.पं.निवडणुक: जात वैधता प्रमाणपत्र दि.१९ पर्यंत सादर करा..