vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवास सुरूवात

आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवास सुरूवात

 

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दि. 14 आणि 15 मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहातील या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन, व्याख्याने, तसेच विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

गुरूवार, दि. 14 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा स्मारकापासून गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गोकुळ शर्मा, प्रा. डॉ. एस. एम. कानडजे, शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित राहतील.

 

त्यानंतर सकाळी 10.30 वाजता पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक सुनील कडासने, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे उपस्थित राहणार आहेत. पंजाबराव गायकवाड उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करतील. दुपारी स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 15 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता वाचन संस्कृतीमध्ये समाजमाध्यमांची भूमिका विषयावर व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत बर्दे, राजेंद्र काळे, लक्ष्मीकांत बगाडे, अरुण जैन, नितीन शिरसाट, सुभाष लहाने, निलेश जोशी, अजय बिलारी, वसिम शेख, गजानन धांडे, रणजितसिंग राजपूत, रफिक कुरेशी सहभागी होतील. दुपारी 12.30 वाजता सार्वजनिक ग्रंथालयांचे सामाजिक योगदान या विषयावर प्रा. कि. वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, सुनिल वायाळ, डॉ. राजेंद्र गणगे, सुनील झोरे, अनंत सातव, निशिकांत ढवळे, महेंद्र बोर्डे उपस्थित राहतील.

 

जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

मनरेगातून जि.प.शाळांचे सौंदर्यीकरण,सुविधाविकास;जिल्हाधिकाऱ्यांनी मागविले शाळानिहाय नियोजन

vishwatmaklokswamivarta

वसतीगृह शाळा/कॉलेजसाठी सैनिकी प्रशिक्षक,क्रीडा शिक्षक,वसतीगृह अधिक्षक प्रशिक्षक,लिपीक सिक्युरिटी गार्ड पदांसाठी माजी सैनिकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

युजीसी नेट परीक्षेसाठी परीक्षा केंद्र-परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू..