vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

 

 

सांगली प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे यापूर्वी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते. तथापि या योजनेस मुदतवाढ मिळाल्याने आता विद्यार्थी 31 मार्च पर्यंत अर्ज करू शकतील. या योजनेतंर्गत 11 / 12 वी तसेच बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून 43 हजार रुपये तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5000 व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2000 इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य – मुख्याध्यापक, अधीक्षिका /अधिक्षक, मुलीं – मुलांचे शासकीय वस्तीगृह तसेच जुना बुधगाव रोड सामाजिक न्याय भवन सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारत आरोग्य संघटनेने दिला आयुष मंत्र्यांना यांना प्रस्ताव

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

मिरज येथे 25 सप्टेंबरला रोजगार मेळावा…

vishwatmaklokswamivarta

मानसेवी होमगार्डसाठी ऑनलाईन नोंदणी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्राची पहिली पुरवणी सरमिसळ

vishwatmaklokswamivarta