vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या राज्यातील नवे दर

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या राज्यातील नवे दर…

 

राज्य प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. सरकारी कंपन्यांनी आजच्या म्हणजेच 1 एप्रिल 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. तर काही राज्यांमध्ये किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

 

आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 83.17 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 86.97 वर व्यापार करत आहे. मागच्या महिन्यात निवडणूकांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात केली. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह इतर राज्यातील आजचा भाव

महाराष्ट्रात पेट्रोल ६५ पैशांनी तर डिझेल ६३ पैशांनी महाग झालं. मध्य प्रदेशात पेट्रोल ३१ पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी महागलं. हिमाचल प्रदेशात पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलं. पंजाबमध्ये पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झालं.

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची-अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

vishwatmaklokswamivarta

चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

 राज ठाकरेंची आज पुण्यात धडाडणार तोफ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रथमच मुंबईबाहेर वर्धापन दिन : मनसे पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार

मुंबईकरांसाठी खुशखबर : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी, आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

vishwatmaklokswamivarta

राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे 48 तास महत्त्वाचे…

vishwatmaklokswamivarta