vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

समृद्धीने दूर केली मासेगांवची पाणी टंचाईसतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत टँकर

समृद्धीने दूर केली मासेगांवची पाणी टंचाईसतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत टँकर

———- राज्य प्रतिनिधी

घनसावंगी : हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील मासेगावच्या हजारो कुटुंबांच्या पाण्याचा प्रश्न समृद्धी साखर कारखान्याने सोडवला आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मोफत टँकर सुरु करून गावाची तहान भागवली. याबद्दल मासेगांवच्या महिलांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.

दुष्काळाने होरपळलेल्या घनसावंगी मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांना समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यावतीने मोफत टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक गावांना समृद्धीच्या टँकरने दिलासा दिला आहे. घनसावंगी तालुक्यातील मासेगांवातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. गंगाधर आनंदे यांनी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना पाणी टँकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन शुक्रवारी सतीश घाटगे यांनी टँकर सुरु केले. समृध्दी कारखान्याच्या माध्यमातून टँकर सुरु करून पाण्यासाठी महिलांची होत असलेली हेळसांड थांबवल्याबद्दल गावकऱ्यांनी समृद्धी कारखान्याचे आभार मानले. कारखान्यामार्फत मासेगावात आलेल्या पाण्याच्या टँकरचे रामायणाचार्य लक्ष्मण महाराज आनंदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सतीश आनंदे,चेअरमन प्रकाशराव आनंदे, सरपंच बाबुराव पुरी, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल आनंदे,दत्ताभाऊ आनंदे, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव आनंदे, बापुराव घुमरे, ग्रां.प.सदस्य हनुमंत आनंदे, दामोधर आनंदे, महेश आनंदे, आसाराम आनंदे, दत्ताभाऊ शिंदे, आसाराम आनंदे, श्रीहरी आनंदे, कल्याण आनंदे, सिध्देश्वर आनंदे, एकनाथ आनंदे, सुनील कोळे, गणेश आनंदे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.

संबंधित पोस्ट

15 जून रोजी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विशेष मेळावा

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जवळील मार्गिकेवरच्या भेगेची तातडीने दुरुस्ती

कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

vishwatmaklokswamivarta

सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे* *- ए.एस. राजंदेकर*

vishwatmaklokswamivarta

मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी जागरूक राहावे- अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिन साजरा  

vishwatmaklokswamivarta