vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

डॉ.कल्याण काळे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन –माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार

डॉ.कल्याण काळे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन –माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार —

 

-जालना(प्रतिनीधी)जालना लोकसभा मतदार संघातील इंडिया(महाविकास)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या जालना येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दि.२४ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जालना शहरातील जुना मोंढा गेटसमोर असलेल्या शाम लॉज जवळ प्रथम मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि त्यानंतर जुना मोंढा घड्याळ घर परिसरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमास राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विधान परिषदेचे सभागृह नेते बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ.रोहित पवार यांची विशेष उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ.राजेश टोपे,आ.कैलास गोरंटयाल,माजी आमदार तथा जिल्हा प्रभारी नामदेवराव पवार,माजी मंत्री तथा निरीक्षक अनिल पटेल,आ.राजेश राठोड,जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार शिवाजीराव चौथे,सुरेशकुमार जेथलिया,चंद्रकांत दानवे,संतोष सांबरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एकबाल पाशा,जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे,आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे,सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश पदाधिकारी संतोष गाजरे, सिटुचे ज्येष्ठ नेते कॉ.अण्णा सावंत,मारोती खंदारे,शरद पडोळ,साईनाथ चिन्नादोरे,आरजेडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद जावेद,शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी,राष्ट्रवादी यु.काँ.शहराध्यक्ष राजेंद्र जाधव,अनिल मिसाळ यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया(महाविकास)आघाडीच्या निवडणूक प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

—————————————-

[22/04, 8:16 pm] Swamiji: बुधवारी उमेदवारी दाखल करणार

—————————————-

जालना लोकसभा मतदार संघातील इंडिया(महाविकास)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे हे दि.२४ एप्रिल बुधवारी रोजी सकाळी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी राज्याचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे दाखल करणार असल्याची माहिती इंडिया(महाविकास)आघाडी निवडणूक प्रचार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे- जिल्हाधिकारी किशन जावळे

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर!**महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले जिल्हा प्रशासन, महावितरणच्या कामाचे कौतुक*

महासंस्कृती, महानाट्य महोत्सव; दि.२२ ते २५ सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta