vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आजपासून सुरुवात

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध,नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आजपासून सुरुवात.

 

मुंबई प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे, असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

 

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे

.३ मे २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल.

 

‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्रमांक, २०५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

तसेच ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, पहिला मजला, कक्ष क्रमांक १३२, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

 

४ मे २०२४ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. ६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे

.लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

 

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख – २६ एप्रिल २०२४

 

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ – ३ मे २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख – ०४ मे २०२४

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख व वेळ – ०६ मे २०२४ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

मतदानाची तारीख व वेळ – २० मे २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

* मतमोजणीची तारीख – ०४ जून २०२४

 

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – ६ जून २०२४

संबंधित पोस्ट

अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू, भाविकांची 16 वी तुकडी पहलगाम आणि बालटालसाठी रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन! नवाब मलिक अस्वस्थ झाले असल्याचे वृत्त

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाकरता संभाजी ब्रिगेडचा विधानभवनाच्या गेटसमोर राडा…

vishwatmaklokswamivarta

वर्क फ्रॉम होम””ही संकल्पना पुढे आनण्याची सुरवात.

vishwatmaklokswamivarta

कानिफनाथ महाराज देवस्थान प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाची वक्फ बोर्ड व मुसलमान गटांना कारणे दाखवा नोटीस !हिंदू धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

डॉ. राजेंद्र देवरे मुंबई विद्यापीठाच्या संपर्क अधिकारी पदी नियुक्ती , सर्व थरातून  अभिनंदन.