vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मासळी विक्रेत्यांमध्येही स्वीप पथकाने केली मतदानाबाबत जनजागृती

मासळी विक्रेत्यांमध्येही स्वीप पथकाने केली मतदानाबाबत जनजागृती

 

ठाणे, प्रतिनिधी (जिमाका)- ठाणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून शहरात सर्वत्र मतदान जनजागृती करण्यात येत आहे. 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा अंतर्गत लोकमान्यनगर येथील पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील मासळी विक्रेत्यांमध्ये मतदानाबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली.

 

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. 20 मे 2024 ही मतदानाची तारीख लक्षात ठेवून आपले राष्ट्रीय हक्क बजावा असे आवाहन यावेळी मासळी विक्रेत्यांना करण्यात आले.

 

पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील विक्रेत्यांनीही मी मतदान करणार अशा घोषणा दिल्या. मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो.. अशी जनजागृती स्वीपच्या माध्यमातून करण्यात आली.

 

यावेळी स्विप टिमचे सहकारी श्री.राजेंद्र परदेशी श्री.रोहीत चेटोले , श्री.अनंत सोनावळे, श्री.अविनाश सावंत, श्री.सिताराम परब व श्री.नैनेश भालेराव उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने विदेशी नागरिकाकडून पोटात लपवून आणलेले १३ कोटीचे १३०० ग्रॅम कोकेन जप्त केल.

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीच्या उत्सवाकरिता लोकशाहीचा जागर सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

अरुणोदय वॉकस तर्फे कलानगर मध्ये ज्येष्ठांचा सन्मान..

भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू

vishwatmaklokswamivarta

पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क – नवी मुंबईतील परिस्थिती सुस्थितीत

vishwatmaklokswamivarta