vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

 5 जून ते 14 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा नवीन हवामान अंदाज..

 5 जून ते 14 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा नवीन हवामान अंदाज..

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

 

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.

 

मुंबईतील काही भागात अतिवृष्टी होणार

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.

 

राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता

सध्या पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार पाऊस आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. म्हणजेच जून महिन्यातच अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.

 

अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस

सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. भाजीपाला पिकांसह फळबागांचं अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे.

संबंधित पोस्ट

हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा चा गुन्हा; जामीन मिळेपर्यंत कारागृहात.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यां प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाच्या पुस्तिकेमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी कृषी विभागाने केले आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

नारायण राणे केंद्रीय मंत्री यांच्या ‘अधिश’ बंगल्यावरून पालिकेचं पुन्हा 15 दिवसांचं अल्टिमेटम; बांधकाम न पाडल्यास कारवाई करण्याची नोटीस

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta