vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एक कोटी वृक्षलागवडीत सर्व घटकांचा सहभाग घेणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

एक कोटी वृक्षलागवडीत सर्व घटकांचा सहभाग घेणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा, प्रतिनिधी: शासनाच्या निर्णयानुसार एक जुलैपासून एक कोटी वृक्षलागवडीस सुरवात होणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षलागवडी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, वृक्ष लागवड मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. यासाठी शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती, कर्मचारी, बचतगटांच्या महिलांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे. या वृक्ष लागवडीसाठी रोपे मोफत देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर फळपिक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येऊन वृक्ष लागवड करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीमधील रोपे वाढविण्यासाठी प्रयत्‍न करण्यात येणार आहे. तसेच ही झाडे दत्तक घेण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

 

वृक्ष लागवड मोहिमेसोबतच बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बांबूची रोपे इश्वेद बायोटेक या कंपनीकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने रोपांची मागणी नोंदवावी. बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षात हेक्टरी 7 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे बांबू शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे स्वतंत्र निर्देश येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाची ही प्रमुख योजना म्हणून राबविल्या जाणार आहे. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून बांबू लागवड आणि विपनन संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

 

वृक्षांची रोपे सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या नर्सरीमधून देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोहिमेसाठी जागा निश्चिती करण्यात यावी. यासाठी मोकळ्या जागा, अतिक्रमीत जागांचा शोध घेऊन याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी. शाळांमधील मोकळ्या जागा, कुंपन, ग्रामपंचायतीचे क्षेत्र, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक झाड लागवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 28 हजार बचतगटांच्या महिलांनाही यात सहभागी करून त्यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्षाचे संगोपन करण्यासाठी ही झाडे दत्तक देण्यात येणार आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृतीची आंदोलनाद्वारे मागणी !

vishwatmaklokswamivarta

आज जनता दल युनायटेड चे अध्यक्ष नितीश कुमार घेणार राष्ट्रवादी पार्टी अध्यक्ष शरद पवार यांची भेट, ‘या’ मुद्द्यावर करणार चर्चा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन-2023 पुस्तिकेचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याहस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना महाराष्ट्राचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभाग

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

vishwatmaklokswamivarta