vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

 

अमरावती, प्रतिनिधी : पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या लेखी स्वरुपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
पोलीस मुख्यालयात आज डॉ. भोयर यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवरकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी, पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी त्यांचे कुटुंबीय यांना होत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. संवादामधून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या समोर येत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निवासस्थानी बांधण्यात येत आहेत. याबाबत राज्यस्तरावर समिती सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे आणि निवास व्यवस्था आहे. या ठिकाणी आवश्यक ती तरतूद करून समस्या मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
पोलीस कुटुंबीय कायम दुसऱ्याच्या संरक्षणासाठी तयार असतात. मात्र पोलीस कर्तव्यावर असताना त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. आज संवादामध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांवर दखल घेण्यात येईल. या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरुपात मागविण्यात येऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन बांधकामे हाती घेण्यात आली आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघत असल्याचे सांगितले. श्रीमती बारवरकर यांनी प्रास्ताविक केले. विशाल आनंद यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

जम्मू काश्मीरच्या: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन संशयितांचे रेखाचित्र जारी…

कुणबी जात प्रमाणपत्र नोंदी शोधण्यासाठी संकेतस्थळाची मदत घ्या – विभागीय आयुक्त जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गावागावातील अभिलेख उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित,जात पडताळणीची १६ हजार ११० प्रकरणे निकाली ; एसईबीसीची २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रे वितरित

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न