vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश.

राज्य प्रतिनिधी

मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश देण्यात आले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जळगाव, मौलाना आझाद, अल्पसंख्यांक महामंडळ, जळगाव या कार्यालयांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना /महामंडळे/उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.

संबंधित पोस्ट

नाशिक मध्ये खाजगी बसला भीषण आग, दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मदत जाहीर

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित* 

vishwatmaklokswamivarta

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

मी सॅम डिसुझा नाही, माझ्या प्रोफाईचा चुकीचा वापर, पालघर पोलिसांत प्रभाकर साईलविरोधात तक्रार दाखल…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला आढावा..

vishwatmaklokswamivarta