vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा

 बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा

 

राजकीय प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर गोंधळ घातला. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौरा करतायत. यात दोन दिवस ते बीड दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे बीड शहरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सुपारीबाज चले जाओ अशा घोषणा  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात, त्यामुळे त्यांना जाब विचारायचा असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या देखील टाकण्यात आल्या.

 

राज ठाकरे हे लोकसभेनंतर आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलन शांततेत सुरू असताना याच्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. राज ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

धाराशिवमध्येही झाला होता विरोध

याआधी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी घातला. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

vishwatmaklokswamivarta

मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!,नागपूर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

जिल्हा परिषद ठाणे राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन,पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जनसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर निवेदने प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

vishwatmaklokswamivarta