vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुळगाव बदलापूर नगर परिषद इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण**बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे आश्वासन*

कुळगाव बदलापूर नगर परिषद इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण**बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे आश्वासन*

 

              राज्य प्रतिनिधी- आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करु लागले आहेत. बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. तुम्ही सांगा आम्हाला महानगरपालिका पाहिजे, तेव्हा महानगरपालिका केली जाईल. सरकार शेवटी लोकभावनेला मदत करणारे आहे. तुमचा आवाज ऐकणारे सरकार आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापूर येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या उर्दू शाळा क्र. ०२ व कुळगाव बदलापूर नगर परिषद नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश(बाळ्या) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुळगाव बदलापूर नगर परिषदेची ही इमारत भव्य दिव्य आहे.या इमारतीसाठी मी मुख्यमंत्री असल्याने 25 कोटी रुपये देऊ शकलो. शेती व पायाभूत सुविधामध्ये आपण चांगले काम केले आहे.जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. लोक उपोषण करतात, आंदोलन करतात, कारण मुख्यमंत्री देणारा आहे. लोकांचा विश्वास आहे. देशामध्ये सर्वात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपला परदेशी गुंतवणूकीमध्ये आपला पहिला नंबर आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे.त्याला मदत करताना आपण आपला हात आखडता घेतला नाही. हे सरकार शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभा आहे.

आम्ही सांगितले होते की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस आपल्या बॅक खात्यात जमा होतील. राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले आहेत. हे सरकार जे बोलत आहे, ते करीत आहे. आपल्या अर्जात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करुन घेऊ. आपले 31 ऑगस्ट नंतर जरी अर्ज आले तरीही आपणाला जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे आपल्या देणार आहोत. आम्ही देणारेआहोत, घेणारे नाही. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात पैसे भरणारे आहे. आपण वेगाने निर्णय घेतले आहेत.महिलांसाठी 107 निर्णय आपण घेतले आहेत,असेही यावेळी सांगितले.

देशातील हे पहिले राज्य आहे. तरुणांना प्रशिक्षण पण देत आहे आणि पैसे पण देत आहे.आपल्या राज्यात उद्योग येत आहेत.त्यांना मनुष्यबळ आपण त्यांना देत आहोत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजेनमधून 547 लोकांना ठाणे महानगरपालिकेने तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहेत.तसेच आपणही कुळगाव बदलापूर नगरपरिषदेमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्या. आपण उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण दिले आहे.मुलींना यापुढे कोणतेही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु केली आहे.जेष्ठांना मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु करण्यात आली

आहे.या योजना सर्व चालू राहणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. जे आपणास आवश्यक आहे, ते आपणास देण्यात येईल.असेही यावेळी श्री.शिंदे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीअपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात व्यापारी संघटना मजबूत करणार – आदेशपालसिंग छाबडा,मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सची नूतन संचालक मंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

हरवलेल्या मुलाची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

 राज ठाकरेंची आज पुण्यात धडाडणार तोफ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रथमच मुंबईबाहेर वर्धापन दिन : मनसे पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार