
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
खेळ प्रतिनिधी- पुणे क्रीडा व युवक सेवा, संचालनालय यांच्या सुचनेनूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जालना जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. तरी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत व उपक्रमामध्ये जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा संघटना, नागरिक, महिला, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे जिल्हास्तरीय 21 वर्षाखालील मुले व मुली वयोगटातील (मुले 3 किमी व मुली 2 किमी) चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर 21 वर्षाखालील मुले-मुली दोरीवरील उडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर 21 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटातील बॅड मिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर 21 वर्षाखलील मुले व मुली या वयोगटातील शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 2023-24 या वर्षात शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले व विविध एकविध जिल्हा क्रीडा संघटने मार्फत राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू यांनी दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे कार्यालयीन वेळेत सहभागी स्पर्धेच्या प्रमाणपत्राच्या प्रतिसह आपली माहिती सादर करावयाची आहे. दि. 27 ऑगस्टनंतर माहिती स्विकारली जाणार नाही. सन 2023-24 या वर्षात जालना जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंना मान्यवराच्या हस्ते दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता “राष्ट्रीय क्रीडा” दिनाच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सन 2023-24 राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंचा सत्कार व जिल्ह्यातील एकविध जिल्हा संघटनेकडून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंचा सत्कार समारंभ क्रीडा संकुल जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे (7758863991), रेखा परदेशी (9022951924), संतोष वाबळे (7588169493), सिध्दार्थ कदम (9403124007), आशिष जोगदंड (8888436828) यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-



