
मुंबईत शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे भरून वाहू लागले तर चार जलाशय कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता..
मुंबई प्रतिनिधी
मुंबई परिसरातही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ३ जलाशय पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर चार जलाशय कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणखी एक तलाव, मध्य वैतरणा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विहार आणि मोडक सागर तलावात मोठ्या प्रमाण पाणीसाठा जमा होत आहे. दरम्यान आज दिवसभर मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इतर चार धरणंही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून पाणी कपातीची समस्याला मुंबईकर खूपच हैरान होता त्यातून आता दिलासा मिळणार आहे अनेक दिवसापासून कमी पाणीपुरठ्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले. गेल्या महिन्यात पडलेल्या पावसामुळे धरणसाठ्याच मोठ्या प्रमाणात पाणी आले.कोकण, मराठवाडा, विदर्भातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणे भरली आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये एकूण 95.27 टक्के पाणी साठा आहे. विहार – 100 टक्के, मोडक सागरमध्ये 100 टक्के, तानसा – 98.53 टक्के, तुलसी जलायशात 97.71 टक्के, अप्पर वैतरणा धरणात 94.27 टक्के, मध्य वैतरणा – 97.61 टक्के, भातसा – 93.23 टक्के भरले आहे. मोडकसागर, विहार ही धरण पूर्णक्षमतेने भरली आहेत, तर तानसा धरण कोणत्याहीक्षणी भरण्याची शक्यता आहे.



