vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन*

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन*

 

राज्य प्रतिनिधी सोयाबीन पिकावर पिवळा मोझेइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणत प्रादुर्भाव दिसून येतो. जर यावर्षी कुठे आढळून आल्यास खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात

 

पिवळा मोझेंइकची लक्षणे (Yellow Mosaic Virus – YMV)

 

रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, तद्नंतर पानावर चमकदार पिवळया हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यता रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो.

 

सोयाबीन मोझॅइक विषाणूची लक्षणे (Soybean Mosaic Virus – SMV):

 

या रोगाचा प्रादुर्भाव सद्याजरी दिसून आला नसला तरी भविष्यातील खबरदारी म्हणून या रोगाची लक्षणे व व्यवस्थापन-

 

रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसुन येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलुन करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यता रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होते.

 

प्रतिबंधात्मक उपाय:-

 

· सुरूवातीसच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावीत.

 

· पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

 

नियंत्रणाचे उपाय:-

 

· पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत

 

रोग/किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किर्डीच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

 

इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के डब्लुजी २ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २५ टक्के वायफेन्ध्रीन २५ डब्लुजी ५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी, फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून बापरावीत.

 

· टिपः नियंत्रण उपायामधील रासायनिक किटकशाकांच्या शिफारसी ह्या तदर्थ (Adhoc) स्वरुपाच्या आहेत.

 

 

 

(तांत्रिक माहिती व सहकार्य डॉ. पं. दे. कृ.वि. अकोला)

संबंधित पोस्ट

स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

श्री. वरद गणेश वाचनालया तर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत सुनील चौंडीकर, आर्यन सोनवणे आपापल्या गटात विजयी

वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार*    *- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

vishwatmaklokswamivarta

पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये*कृषि विभागाचे आवाहन

डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व्यक्त केले दुःख