
“येता संकट बालकावरी १०९८ मदत करी.”बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर, (विमाका) :- संकटग्रस्त बालकाना २४X७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे,
आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, या करिता कोठे संपर्क करावा या बाबते सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.
सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकाना २४X७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी असे आवाहन महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे



