vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो.”*_

.*🌹 ओम नमः शिवाय🌹**🌹🙏प्रभात पुष्प🙏🌹*

अध्यात्मिक वार्ता

_*”संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो.”*_

_*दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात, कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात.*_

_*अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये…*_

_*जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात, तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजीत करून यश प्राप्त करण्यासाठी असतात.*_

_*”सृष्टी” कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही! पण “दृष्टी” बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.*_

_*पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे-छोटे सूविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात..*_

_*स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो थोडा वेळ थांबून दुखते पण आयुष्यभर फायदा होतो.*_

_*प्रार्थनेत परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्या बरोबर असतात, तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या बरोबर असतो..!*_

*💐शिवशंकर स्वामी इटोलीकर💐*

आज दिनांक २ सप्टेंबर २०२४ सोमवार

*बैलपोळ्याच्या व पिठोरी सोमवती अमावस्या आणि शेवटचा श्रावणी सोमवार तसेच*

*आभाळा एवढी माया तिची ईश्वर समान कृपातीची अशा मातेस. मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा…💐💐*

आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच भोळ्या शंकराच्याचरणी प्रार्थना …💐💐

संबंधित पोस्ट

शिवलीलामृत* 🌹 ( मराठी विवेचनासह ) *अध्याय पहिला*

आत्मचिंतन  🙏 प्रभु प्रसा द

vishwatmaklokswamivarta

वेळ अमावास्या   🚩प्रभु प्रसाद🚩

llकुटुंब व्यवस्थापनll संस्कार

vishwatmaklokswamivarta

नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?  व्रताचे नियम

vishwatmaklokswamivarta

🌹🌹प्रभु प्रसाद🌹🌹

vishwatmaklokswamivarta