vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

वित्त विभाग:करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा…

वित्त विभाग:करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा…

 

 

मुंबई प्रतिनिधी

करदात्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) अध्यादेश,2024 च्या प्रारुपास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

केंद्रीय वस्तू व सेवाकर कायदा, २०१७ व महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, २०१७ यातील तरतुदीं मध्ये एकसुत्रता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे तसेच करदाते आणि वस्तू व सेवा कर विभाग यांच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

 

२०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ या वित्तीय वर्षांसाठी कलम ३९ अन्वये ३० नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या दिवसापर्यंत दाखल केलेल्या कोणत्याही विवरणामध्ये निविष्टी कराची जमा रक्कम घेण्यास पात्र असेल अशी तरतूद करण्यासाठी, तसेच २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वित्तीय वर्षांसाठी काही मागणी नोटिशींच्या संदर्भात सशर्त व्याज आणि शास्ती माफ करण्याची तरतूद देखील आहे.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीउद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेग वाढणार..

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत कार्ड योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजाणी करावी  –जिल्हाधिकारी किशन जावळे

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेशविश्वास दिलात तर विकास हमखास – रावसाहेब पाटील दानवे विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

vishwatmaklokswamivarta

मराठा ECO बटालियनची विविध पदांसाठी कोल्हापूर येथे भरती रॅली…

vishwatmaklokswamivarta

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे  चौथ्या दिवशीही सुरू.*

vishwatmaklokswamivarta