vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सतीश घाटगे पाटलांच्या प्रयत्नाला यश : ३ हजार गरीब कुटुंबाना मंजूर झाले घरकुल…

सतीश घाटगे पाटलांच्या प्रयत्नाला यश : ३ हजार गरीब कुटुंबाना मंजूर झाले घरकुल…

 

राज्य प्रतिनिधी: ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील गरीब कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या घरकुल योजना राबविण्यात येतात. दलित कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास आणि ओबीसी प्रवर्गातील गरीब कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 3000 गरीब कुटुंबांना घरकुल मंजूर करून देण्यात भाजप नेते सतीश घाटगे यांना यश आले आहे. दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्यावतीने घरकुल मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.

 

अनेक वर्षापासून घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील दलित कुटुंब तसेच ओबीसी प्रवर्गातील अनेक गरीब कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित होते. या खऱ्या गरजू आणि गरीब कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी सतीश घाटगे यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करून त्यांचा शासनाकडे पालकमंत्री अतुल सावे यांच्यामार्फत पाठपुरावा केला. अतुल सावे यांच्या सहकार्यातून व सतीश घाटगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील 3000 गरीब कुटुंबांना रमाई आवास व यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थींना आनंद व्यक्त करत सतीश घाटगे व सरकारचे आभार मानले.

 

सरकारचे आणि प्रशासनामुळे हे शक्य झाले –

प्रत्येक गरिबाला पक्के घर देण्याचे ध्येय सरकारचे आहे. म्हणून गरीब कुटुंबासाठी निधीची तरतूद करून सर्वाना घरे देण्यासाठी घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. खऱ्या गरीब कुटुंबाला घरकुल मंजूर करून देता आले याचे समाधान आहे. सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे मी लाभार्थीच्या वतीने आभार मानतो.

 

सतीश घाटगे, नेते भाजप , चेअरमन समृद्धी साखर कारखाना

संबंधित पोस्ट

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वसतीगृह; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे शहरी भागात बचत गटांची संख्या वाढवावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta