
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्यावतीनेसरकारचे लक्ष वेधण्यासाठी २९ सप्टेंला घाटकोपर रमाबाईनगर ते दादर चैत्यभूमीपर्यंत रॅलीचे आयोजन
( मुंबई प्रतिनिधी)
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स् एज्युकेशन सोसायटी संचालित सिध्दार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचा निधी थांबविण्यात येऊन सामाजिक न्याय विभागाचा निधी ही इतरत्र वळविण्यात आला.सरकारच्या मनमानी विरोधात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी २९ सप्टे.२४ रोजी दु. ३.०० वा. घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथून चैत्यभूमी ते दादर पर्यंत रॅली काढण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी नेते चंद्रशेखर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळेस त्यांच्या समवेत उपाध्यक्ष धर्मराज ब्राम्हण, सरचिटणीस प्रशांत मोरे, मुंबई संघटक अश्विन वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण मध्य मुंबईचे सरचिटणीस शिरिषभाई चिखलकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळेस त्यांनी सांगितले की ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी १९४५ साली पीपल्स् एज्युकेशनची स्थापना केली होती. याच संस्थेच्या सिध्दार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय आनंदभवन या इमारतीच्या नुतनीकरणासाठी तात्कालिन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी १२ कोटी ४२ लाख रुपये मंजुर केले नंतर ते
काम देखील पुर्ण झाले परंतु इमारतीचेकाम अपूर्ण झाल्यामुळे ४२ कोटींचा वाढीव निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्याकडे सादर केला असता उर्वरीत ३२ कोटी देण्यास सरकार दिरंगाई करीत आहे, मंत्रालयाची फाईल कात्रीमध्ये अडकवून अधिकारी पैसे देण्यास विलंब लावीत आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काम सोडून निघून गेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, त्यातच महाविद्यालयाची लिफ्ट बंद पडली आहे . एकंदरीत महाविद्यालयाची डागडुजी न झाल्यामुळे नवीन विद्यार्थी प्रवेश घेण्यास घाबरत आहेत. काही विद्यार्थी महाविद्यालय सोडून जात आहेत. अशा महाविद्यालयात विद्यार्थी नसतील तर महाविद्यालय कसे चालेल? अर्थात महाविद्यालय बंद पाडण्याचा डाव मंत्रालयातले अधिकारी करीत आहेत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्रव्यवहार करुन त्याची माहिती दिली आहे . शिवाय कोनशिला बसविण्याची विनंती केली आहे तरी देखील मुख्यमंत्र्यांनी वेळ देत नाही.त्यामुळे २९सप्टे. २०२४, दु. ३ वा. घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगर ते चैत्यभूमी, दादर पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे असल्याचे त्यांनी नमूद केले.
जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी राज्य सरकार यांच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.



