
गोवंडीच्या शिवाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील भ्रष्टाचारप्रकरणी ९ ऑक्टोबरला आंदोलन
मुंबई- प्रतिनिधी
गोवंडीच्या शिवाजी नगर येथील स्वा. वीर सावरकर हिंदू विद्यालयात काही समाज कंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन मोठेप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे . या भ्रष्टाचाराची चोकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ९ ऑक्टोबरला आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला .
या काही समाजकंटकांनी पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले.त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत निबंधकानी कारवाई केली होती. तरी देखील संबंधितां चा मनमानी कारभार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .
याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली असता त्या तकारीची अद्याप ही दरवल घेतली नसल्याचे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



